शैक्षणिक कर्ज म्हणजे एज्युकेशन लोन ही आजच्या काळातली एक नितांत गरज आहे. . आजच्या या लेखामध्ये आपण शैक्षणिक कर्ज हा विषय बघुयात.ज्यांना खरंच शिकण्याची इच्छा आहे त्यांना आर्थिक कमतरता हा अडथळा नसून शैक्षणिक कर्ज हा एक मार्ग आहे ज्याद्वारे प्रत्येक विद्यार्थी उच्च शिक्षण घेऊ शकतो आणि उच्च विभूषित होऊन स्वतःला आणि परिवाराला पुढे नेऊ शकतो.आजच्या या पिढीमध्ये अशी खूप उदाहरणे पाहिले आहेत ज्यामध्ये मुले किंवा मुली हे शैक्षणिक कर्ज घेऊन शिकतात आणि नोकरी लागल्यावर ते कर्ज फेडतात. जर घरामध्ये परिस्थिती बेताची असेल तर शैक्षणिक कर्जा शिवाय पुढील शिक्षणाला पर्याय नाही.
शैक्षणिक कर्ज घेण्याकरता विद्यालक्ष्मी पोर्टल सरकारच्या उच्च शिक्षण विभाग आणि आर्थिक मंत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने बनवले आहे . पोर्टल चे नाव (https://www.vidyalakshmi.co.in/) हे आहे . एज्युकेशन लोन घेण्याकरता विद्यार्थ्याला सगळ्यात आधी कॉलेज मध्ये ऍडमिशन घ्यावी लागते. ऍडमिशन घेतल्यावर त्याला कॉलेज कडून बोनाफाईड सर्टिफिकेट आणि एक्सपेंडिचर सर्टिफिकेट म्हणजे चार वर्षे पूर्ण होण्याकरता किती फीस लागू शकेल हे सर्टिफिकेट मिळते.काही ठिकाणी एक्सपेंडिचर सर्टिफिकेट ला फीस स्ट्रक्चर असे हि म्हणतात . यामध्ये तो विद्यार्थी हॉस्टेल फीस पण ॲड करू शकतो.हॉस्टेल फीस आणि चार वर्षाची इंजिनिअरिंगची फीस हे सगळे मिळून त्याला सगळे किती लोन मिळेल हे कळते.
विद्यालक्ष्मी पोर्टल वर विद्यार्थयांचे नाव दहावीचे मार्कशीट प्रमाणे असावे लागते आणि त्याचा मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी हा करेक्ट लागतो . विद्यालक्ष्मी हे असे पोर्टल आहे ज्या द्वारे तुम्ही एकाच वेळी अनेक बँका ना अर्ज करू शकता.कॉमन एज्युकेशन लोन एप्लीकेशन फॉर्म म्हणजेच CELAF. हा फॉर्म भरून स्टुडंट एज्युकेशन लोन अर्ज करू शकतो. विद्यालक्ष्मी पोर्टल ला रजिस्ट्रेशन आणि लॉग इन करावे लागते . विद्यालक्ष्मी पोर्टल ला रजिस्ट्रेशन झाल्यावर सगळे डॉक्युमेंट्स हे अपलोड करावे लागतात आणि आपल्या एप्लीकेशन फॉर्म ची म्हणजेच अर्जाची प्रिंट आउट घेउन सगळ्या झेरॉक्स त्याला जोडावे लागतात.डॉक्युमेंट अपलोड झाल्यावर विद्यार्थी त्या डॉक्युमेंट ला ट्रॅक करू शकतो म्हणजे ते लोन कोणत्या स्टेजला आहे ,डॉक्युमेंट अपलोड झालेले आहेत का, काय स्टेटस आहे हि सगळी माहिती विद्यालक्ष्मी पोर्टल वर मिळते.
हे रजिस्ट्रेशन आणि लॉगिन केल्यानंतर त्याला कॉलेज कडून मिळालेले डॉक्युमेंट्स जसे एक्सपेंडिचर सर्टिफिकेट ,आधार कार्ड, पॅन कार्ड आणि आई-वडिलांचे इन्कम सर्टिफिकेट सबमिट करावे लागते. या वेबसाईटवर त्याचा एक आयडी जनरेट होतो आणि मग त्याला तीन बँकांचे ऑप्शन मिळते. ज्यामधून तो एक बँक सेलेक्ट करू शकतो.शक्यतो विद्यार्थी आपल्या पालकांबरोबर जावे .
सगळया डॉक्युमेंट्स चे तीन झेरॉक्स सेट करून बँकेत जावे.बँकेमध्ये मॅनेजरकडे फॉर्म आणि सगळे डॉक्युमेंट सबमिट केल्यावर बँक डॉक्युमेंट्स व्हेरिफाय करते आणि शैक्षणिक कर्जाची प्रक्रिया चालू होते.एक उदाहरण म्हणून आपण इंजिनिअरिंग कॉलेजच्या एका वर्षाची फीस एक लाख आहे असे गृहीत धरूयात आणि हॉस्टेलची फीस वर्षाला 40 हजार आहे असे गृहीत धरूयात . सगळे मिळून चार वर्षाकरता टोटल अमाऊंट जी आहे ती पाच लाख 60 हजार रुपये होते. एक ते पाच लाख या उत्पन्नामध्ये कर्जाचा जो दर आहे तो वेगळा आहे आणि पाच लाखाच्यावर कर्जाचा दर परत वेगळा आहे तसेच सात लाखांच्या वर जर अधिक लोन असेल तर कर्जाचा दर आहे तो वेगळा आहे.हे लक्षात घेऊन लोन घेताना अमाऊंट मागता येते.सगळे डॉक्युमेंट व्यवस्थित सबमिट केल्यावर आणि कॉलेजचे लेटर त्याच्यामध्ये असल्यावर त्या विद्यार्थ्याला तेवढे पैसे मंजूर होतात.प्रत्येक वर्षी शैक्षणिक कर्जाचा हप्ता म्हणजे कॉलेजचे फीस कॉलेज च्या अकाउंटला जमा होते
यामध्ये एक खूप महत्त्वाची अट अशी आहे की प्रत्येक वर्षी तो मुलगा पास झाला पाहिजे म्हणजे पुढच्या वर्षीचे लोन मंजूर होते जर विद्यार्थी नापास झाला तर लोन मंजूर होत नाही.त्यामुळे प्रत्येक वर्षी चांगल्या मार्कांनी पास होणे हे खूप महत्त्वाचे आहे ज्या वेळेला तुम्ही एज्युकेशन करता लोन ला अप्लाय करता आणि त्याद्वारे शिक्षण घेता.कर्ज मंजूर होण्याकरता एक ते दोन महिने लागतात .
लोन प्रोसेसिंग ऑनलाईन ट्रॅक करता येते. शैक्षणिक कर्ज मंजूर झाल्यावर बँक विद्यालक्ष्मी पोर्टल वर अपडेट करते की कर्ज मंजूर झाले आहे. आणि कर्ज मंजूर झाल्याचा फोन पण येतो. विद्यालक्ष्मी पोर्टल वरील युजफूल लिंक्स म्हणून लिंक दिली आहे ज्यामध्ये तुम्हाला इंडियन बँक असोसिएशन ची माहिती दिली आहे.
खरंच शैक्षणिक कर्ज म्हणजेच एज्युकेशन लोन हा एक असा पर्याय आहे ज्याद्वारे विद्यार्थी हा उच्च विभूषित होऊ शकतो आणि खरंच स्वतःला आणि परिवाराला पुढे घेऊन जाऊ शकतो.
लेखक : प्राध्यापक भूषण चंद्रशेखर कुलकर्णी,
डेप्युटी डायरेक्टर ऍडमिशनस,
एमआयटी औरंगाबाद.
मोबाईल नंबर: ९४२०४०१०९३
Email ID: bhushan.kulkarni@mit.asia